बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांची करचोरी केल्याची माहिती - आयकर विभाग
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
आयकर विभागाने गेल्या तीन दिवसांपासून सोनू सूदच्या मुंबई येथील निवासस्थानी तपास केला. त्यानंतर एक प्रसिद्धीपत्रक काढून शनिवारी वरील माहिती दिली आहे.48 वर्षीय सोनू सूद नुकताच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी ब्रँड अॅम्बेसिडर बनला आहे. आयकर विभागाच्या मते, सोनूच्या स्वयंसेवी संस्थेने 2.1 कोटी रुपये परदेशातून क्राऊड फंडींगच्या माध्यमातून जमवले आहेत. हे परदेशी योगदान (विनिमय) कायद्याचा उल्लंघन आहे. सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर टॅक्स चोरी करण्यात आल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत,सोनू सूदने आपलं अघोषित उत्पन्न बनावट स्त्रोतांमार्फत घेण्यात आलेल्या कर्जाच्या स्वरुपात दाखवलं होतं, असं आयकर विभागाने म्हटलं.आतापर्यंत 20 बनावट नोंदी विभागाला आढळून आल्या. यामध्ये रोख रकमेऐवजी चेक देण्यात आलं होतं. त्याशिवाय अधिकाधिक पावत्या टॅक्स वाचवण्यासाठी लोनप्रमाणे दाखवण्यात आल्या.
तसंच बनावट लोनचा वापर गुंतवणुकीसाठी आणि संपत्ती खरेदी करण्यासाठी करण्यात आला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची टॅक्स चोरी करण्यात आली आहे.
No comments