web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडकरासाठी ‘मिस्टर फूडी’’ रेस्टॉरंटचा तडका;19 सप्टेंबरला होणार उदघाटण....!

 

BY - गौरव शेलार,युवा  महाराष्ट्र  लाइवमुरबाड,ठाणे

करोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, बार बंद ठेवण्यात आले होते. 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत लॉकडाउनची बंधने शिथिल करताना, रेस्टॉरन्टचालकांना खाद्यपदार्थ 'टेक अवे/पार्सल' देण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र, त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने रेस्टॉरन्ट व्यावसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते.

         दुसरीकडे नागरिकांची, विशेषत: विद्यार्थी व नोकरदार वर्गाचीही मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे रेस्टॉरन्ट, सुरू करण्याची आग्रही मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच राज्यातील रेस्टॉरन्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात आसनक्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत रेस्टॉरन्ट खुले करण्याची मुभा देण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला.

     याच पार्श्‍वभुमिवर कोरोनाचे नियम पाळुन मुरबाडकरांसाठी ‘मिस्टर फूडी’’ चा तडका बसणार आहे.मुरबाड शहरात पंचायत समिती समोर मुख्य बाजारपेठेत मराठी व्यवसायीक रोहन उल्हास मनोरे , रोहित कैलास मनोरे व त्यांचे सहकारी युवकांनी मुरबाडकरांसाठी ‘मिस्टर फूडी’’ चायनिज तंदुरू सेन्टर सुरू केले आहे.रविवार दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी या ‘मिस्टर फूडी’’ रेस्टॉरंटचे उदघाटन समारंभ पार पडत आहे.या ‘मिस्टर फूडी’’ रेस्टॉरंट मध्ये खवयांना तंदुरी चायनिजचा खमंग तडका बसणार यात शंका नाही.तर मंडळी तुम्ही सुध्दा अवश्य भेट दया या ‘मिस्टर फूडी’’ रेस्टॉरंटला आणि घ्या एखादा खमंग तडका.

No comments