web-ads-yml-728x90

Breaking News

मुश्रीफ कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा? सोमैय्यांनी दिले आयकर विभागाला पुरावे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँड्रिंगद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. याबाबत सोमैय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्यांकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमैय्या यांनी सांगितले की, मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येत आहे. नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसत आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँड्रिंग केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे.

No comments