web-ads-yml-728x90

Breaking News

७५ वा स्वातंत्र्य दिन अंबरनाथ तालुक्यातील पाटीलपाडा-सागाव येथिल स्थानिकांकडून मोठ्या आनंदोत्सवात साजरा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव अंबरनाथ

अंबरनाथ तालुक्यातील पाटीलपाडा-सागाव येथे आपल्या भारत देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन अगदी आंनदोत्सवात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमास आदि. कविता वसंत निरगुडे(आदिवासी महिला समाजसेविका),श्रीम.अपर्णा अनिल बोराडे(सरपंच ग्रुप ग्राम पंचायत सागाव),श्री.अनिल बोराडे,नंदकुमार सुरोशे,मनोज बोराडे,रुपेश सुरोशे,अशोक जाधव,महेंद्र सुरोशे,प्रवीण धलपे,योगेश जमदरे,हरी जाधव,आदी तरुण मंडळी  व ग्रामस्थ उपस्थित होते.

         गावातील तरुणांनी समस्त ग्रामस्थ बंधू-भगिनीं यांना आपल्या राष्ट्रीय सणाच्या कार्यक्रमात १००% उपस्थित राहण्यासाठी गळ घालण्यात आली.आणि तरुणांच्या या जनजागृतीला दाद म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळी,आबाळ वृद्धांसह कार्यक्रमास उपस्थित होते.गावात प्रभात फेरी काढून झेंडावंदन करून गावातील समाज मंदिरात सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनी यांना एकत्र बसविण्यात आले.विद्यार्थी व उपस्थितांची भाषणे,गाणी व करमणुकीचे कार्यक्रम झाले.सदर कार्यक्रमात उस्थितांच्या चेहऱ्यावर एक अनपेक्षित जोश व आनंद उत्साह दिसत होता.तसेच महिलांना चहाच्या कपांचे सेट भेट देण्यात आले.अल्पोपहारासह गोडधोड खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

No comments