web-ads-yml-728x90

Breaking News

पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा, संकल्पना तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सर्वंकष विकास करताना या परिसरात पर्यटकांची संख्या वाढावी याकरिता या उद्यान परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्यादृष्टीने सर्वसमावेशक आराखडासंकल्पना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी मुंबईतील वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारउद्योगमंत्री सुभाष देसाईसार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणजलसंपदामंत्री जयंत पाटीलसार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदेरोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदिपानराव भुमरे यांचेसह मुख्य सचिव सीताराम कुंटेअतिरिक्त मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्तीमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंहप्रधान सचिव विकास खारगेजलसंपदा विभागाचे सचिव कोहिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments