web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोना तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांकडून जबाबदार वर्तन अपेक्षित – राज्यपाल

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

सर्वांच्या सहकार्यामुळे गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवर नियंत्रण प्राप्त करणे शक्य झाले आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांकडून अधिक जबाबदार वर्तन अपेक्षित असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.युवकांमध्ये कौशल्य विकास व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या साई लीला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कोरोना काळात प्रत्यक्ष क्षेत्रात कार्य करणाऱ्या ३० कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

      कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री व गोरेगाव येथील आमदार विद्या ठाकूर, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढा, साई लीला फाउंडेशनच्या अध्यक्षा रश्मी उपाध्याय, विश्वस्त महेश शेट्टी आदि उपस्थित होते.राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, देश संकटात असताना देशातील सामन्यातील सामान्य व्यक्तीने परोपकाराची भावना दाखविली. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, वार्ड बॉय यांसारख्या कोरोना योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन काम केले. हे कार्य देशाला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर अग्रेसर करेल. कोरोनाचे आव्हान थोपविण्यासाठी निर्भय होऊन काम केले पाहिजे मात्र निष्काळजीपणा नको असे सांगताना सुरक्षित अंतर, मास्कचा वापर व सॅनिटायझरचा वापर याबाबत जनजागृती व्हावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

No comments