web-ads-yml-728x90

Breaking News

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन प्रेरणादायी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

द्रष्टे क्रांतिकारकइतिहासकारलेखक व प्रतिभावंत कवी असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे संपूर्ण व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांनी देशासाठी केलेला त्याग व भोगलेल्या हालअपेष्टा यामुळे त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. 

डॉ. विक्रम संपत लिखित  सावरकर: अ कनटेस्टेड’ लेगसी” या इंग्रजी पुस्तकाचे तसेच सावरकर: विस्मृतीचे पडसाद १८८३-१९२४ या त्यांच्याच इंग्रजी पुस्तकाच्या मराठी खंडाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २५) राजभवन येथे झाले त्यावेळी ते बोलते होते. मराठी भाषांतर रणजित सावरकर व मंजिरी मराठे यांनी केले आहे.कार्यक्रमाला माजी राज्यपाल राम नाईकलेखक डॉ विक्रम संपतशिर्डी संस्थानचे विश्वस्त राजेंद्र प्रताप सिंह व संपादक चेतन कोळीलेखिका शोभा डे व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments