web-ads-yml-728x90

Breaking News

मासेविक्रेत्यांसाठी राज्यात शीतगृहे उभारण्याचा आराखडा सादर करण्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे निर्देश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

मच्छिमार संस्थांना डिझेल परताव्याची थकित रक्कम देण्यात येत आहे. मच्छिमारांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्यशासन सकारात्मक काम करत आहे. मासे विक्री वाढविण्यासाठी राज्यात शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) उभारण्यासंदर्भात आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.सह्याद्री अतिथीगृहात मच्छिमार समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात राज्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मंत्री श्री. शेख यांनी लागोपाठ बैठक घेतल्या. बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवारआमदार भाई जगतापविभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्तामत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणेमच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी विजय वैतीदेवेंद्र तांडेलरामदास संघेधनाजी कोळीसंतोष कोळीजोसेफ कोलासोअमोल रोगेदिलीप कोळीलिओ कोलासो आदी यावेळी उपस्थित होते.

No comments