web-ads-yml-728x90

Breaking News

सांगोल्यात भीषण अपघात, ओमनी चक्काचूर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – सांगोला(सोलापूर)

सांगोला-मिरज मार्गावर करांडेवाडी येथे भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालट्रक आणि प्रवासी ओमनी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच 9 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने जवळीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांगोला मिरज रस्त्यावर कारंडेवाडी फाट्याजवळ मालट्रक आणि ओमनी अपघातामध्ये ओमनी ड्रायव्हरसह दोन लहान मुलांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर ओमनीतील 9 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या दुर्घटनेत ओमनीचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

No comments