web-ads-yml-728x90

Breaking News

राग मनात ठेवून कॉरी माफियाच्या कामगारांचा स्थानिक आदिवासी बांधव व महिलांवर भ्याड हल्ल

 


BY -  संतोष चाळके,युवा महाराष्ट्र लाइव – पनवेल

मौजे टेंभोडे वाघऱ्यांची वाडी येथील स्थित दगड खाणी मुले येथे राहणाऱ्या स्थानिक आदिवासी बांधवाना त्यांची लहान मुले,वयस्कर व्यक्ती,यांना वायुप्रदूषण, जलप्रदूषण,तसेच ध्वनिप्रदूषणाचा तसेच वित्तीय हानी सुद्धा होत असल्याच्या कारणामुळे येथील आदिवासी बांधवानी खांदेश्वर पोलीस ठाणे, तहसीलदार, प्रांत येथे रीतसर कायदेशीर तक्रारी केल्याचा राग मनात ठेवून प्रकाश भगत या दगड खाण मालकाच्या कामगारांनी दिनांक ३१/०७/२०२१ रोजी ५ वाजताचे सुमारास प्रकाश भगत यांच्या कॉरी ज़वळील खडकावर बसलेल्या सुनील भगत या आदिवासी बांधवाला प्रकाश भगत यांच्या कॉरी वर काम करणाऱ्या करण पाटील(टेंभोडे गाव), ठकसेन गडगे(टेंभोडे गाव),रणजित पालेकर(वळवली गाव) या तिघांनी सुनील भगत यास खाली बोलावून तू आमच्या कॉरी विरुद्ध पोलीस तक्रार का करतोस म्हणून हाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्त्यातच करण पाटील याने तर चक्क दगडच सुनील याच्या डोक्यात घातला आणि तुम्ही ठाकरा माकरा आमच्या तक्रारी करता म्हणून जातीवाचक शिवीगाळ सुद्धा करू लागले.सुनील यास मारहाण होतेच वेळी सुनील याने त्याचा जीव वाचविन्याच्या हेतुने करण याच्या चावा घेऊन पळ काढन्याचा प्रयत्न केला, हाच प्रकार तेथे दिसताच सुनीलची बहीण संगीता मध्ये व शेजारी इंदू निरगुडा या दोघी सुनीलला वाचण्यास मध्ये पडल्या असता तिन्ही आरोपीनी या महिलांना सुद्धा मारहाण केली व  महिलांबरोबर गैरवर्तन केले आणि म्हनाले की तुम्हाला व तुमच्या नवऱ्याना गायब करू!अशी धमकी देऊन त्यानी पळ काढला.तसेच पीड़ित व्यक्ती यानी नजिकच्या खांदेश्वर पोलिस ठाणे येथे धाव घेतली व माहिति दिली.या बाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात  भा.द.वी.कलम३२४,३२३,५०४,५०६,३४  अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती( अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १८८९ अन्वये 3(1)r, 3(1)s, 3(2)va अन्वये गुन्हा दाखल असून एका आरोपीस अटक झाली असून उर्वरित 02 आरोपी फरार आहेत व अटक आरोपीस ५ तारिख पर्यंत पोलिस कोठडी मीलाली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त भागवत सोनवने करीत आहेत.

No comments