web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यमंत्री विवेकभाऊ पंडीत यांचा मुरबाड आढावा थेट आदिवासींच्या घरात;अधिकार्‍याना सुचवल्या उपायोजना

 

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड ,ठाणे

आदिवासीश्रेत्र आढावा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा विवेकभाऊ पंडीत यांनी मुरबाड तालुक्यातील वांजळे,मुरबाड,शिरवली,म्हसा,मिल्हे अशा आदिवासी वाडयाना भेट देवुन आदिवासीच्या घरात जावुन प्रत्यक्ष समस्या जाणुन घेतल्या.

  रेशनकार्डवरील धान्य आधारकार्ड घरकुल गर्भवती स्त्रीयाना मिळणारे अनुदान पाणी विज रस्ता गावठण अशा सर्वच समस्या जाणुन घेवुन उपस्थित अधिकार्याना तात्काळ उपायोजना करण्याचे आदेश दिले.यावेळी श्रमजिवी संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सपाटे ,सरचिटणीस भालके ,पंकज वाघ ,महेश वाघ उपविभागीय अधिकारी भांडे पाटील कल्याण ,तहसिलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी आवचर, वैद्यकिय अधिकारी बनसोडे ,आदिवासी प्रकल्प विकास अधिकारी, मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ ,सहाय्यक वनसंरक्षक रामदास भांमरे ,पशुवैद्यकिय अधिकारी सिंग ,तलाठी शिंदे ,नगरपंचायतीचे संदीप तेलवणे अन्य विभागाचे अधिकारी श्रमजिवी संघटनेचे मुरबाड तालुक्यातील कार्यकर्ते युवा महाराष्ट्र लाईव्ह (YML TV NEWS )चॅनेलचे मुख्यसंपादक गौरव शेलार आदि उपस्थित होते.

     स्वातंञ्याच्या 74 वर्षात आदिवासी वाडयापाडयात घरकुल विज पाणी रस्ते गावठंण याशिवाय रेशनिंगकार्ड जातीचे दाखले आधारकार्ड अन्य सुविधा मिळाल्या नाहीत याचा पाठपुरावा गेले वर्षेभर श्रमजिवीच्या अभियानातुन श्रमजिवीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामभाऊ वारणा, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बाळारामभाऊ भोईर, ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक सपाटे ,राजेश चन्ने ,भालके त्यांचे सहकारी कार्यकर्त्यानी जनसुविधा मिळाव्यात म्हणुन गाववाडया पाडयात जनजागृती केली.प्रशासनाकडे समस्या मांडुन सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या उदया 75 व्या स्वातंञ्यदिनाच्या काळखंडात आदिवासीना शासन दरबारी न्याय मिळेल असे राज्यमंत्री विवेकभाऊ पंडीत यांच्या आढावा अभियानातुन दिसुन येत आहे.

    महाराष्ट्रात ठाणे जिल्हयात शहापुर आणि मुरबाड या दोन तालुक्यात आदिवासी ट्रॅव्हलएरिया जास्त असुन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडुन भरीव निधीची आवश्यकता आहे 22 गांवे पेसा अंर्तगत असताना त्यांच्या सोयीसुविधाचा अमाप शासकीय निधी उपलब्ध होत नसल्याने दिसुन येतो तसेच घरे गावठण रोजगार नोकर्या पुर्नवसन आणि शासनाच्या सुविधा या आढावा बैठकीतुन उपलब्ध होतील अशी अपेक्षा शासनाकडुन आहे.या आढावा अभियानात अधिकार्याचा चांगलाच आढावा विवेकभाऊ पंडीत यांनी घेवुन तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

No comments