web-ads-yml-728x90

Breaking News

डाॅ.अण्णाभाऊ साठे जयंती पुरस्कार व किराणा किट वाटप करुन साजरी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर

तिसगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी साहित्यरत्न स्वातंत्र्य सेनानी डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले 25 निराधार माता भगिनींना किराणा साहित्य वाटप व कोरोना काळामध्ये मातंग समाजासाठी शासकीय, निमशासकीय,सेवाभावीसंस्था,दानशूर व्यक्तींनी जे सहकार्य केलं त्याबद्दल 45 व्यक्तींचा तिसगाव भूषण ,समाज भूषण ,समाजसेवक, कोरोना योद्धा,शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पाथर्डी तालुक्याच्या वतीने व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवामंच तिसगावच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रदिप ससाणे यांनी केले होते. कार्यक्रमाला उपस्थित पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान गावचे सरपंच कार्यक्रमाचे अध्यक्ष काशिनाथ लवांडे पाटील यांच्या शुभहस्ते अहमदनगरचे सामाजीक नेते तथा लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाकार्याध्यक्ष सुनिल भिमराव सकट यांना शाल श्रीफळ ट्राॅफी देऊन "समाजसेवक" हा बहुमूल्य पुरस्कार बहाल करण्यात आला.सुनिल सकट यांनी कोरोना माहामारीच्या काळात गरुजुंना अन्नधान्य, फेसमास्क,सॅनेटायझर,बिस्कीटपुडे तसेच शालेय साहित्य व वृक्षरोपन करण्यासाठी झाडांची रोपे मोफत वाटप केले. जनजागृती करुन नागरीकांसाठी शासनाकडे विवीध जिवनावश्यक मागण्यांचा पाठपुरावा केला.ह्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्या आला. त्या समयी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंकुश रावजी चितळे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाने, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश भाऊ शेलार ,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन भरत गारुडकर, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व प्रशासकीय अधिकारी व व्यापारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप ससाने जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग, सामाजीक विचार मंचाचे अशोकराव शिंदे सर,काॅग्रेस कमिटी अनुसुचीत नगर तालुका अध्यक्ष गणेश ढोबळे,आदी सकल समावेशक पक्ष संघटनांचे कार्यकर्ते उपस्थीत होते. विनम्र आभार प्रदर्शन अण्णाभाऊ साठे युवा मंच अध्यक्ष रॉयल भाऊ शिंदे यांनी केले होते

 

No comments