web-ads-yml-728x90

Breaking News

भुईबावडा घाटातील रस्ते व सुरक्षा कठडे काँक्रीटचे करणार - पालकमंत्री सतेज पाटील

 


BY - पंकज मोरे,युवा महाराष्ट्र लाइव – वैभववाडी

वारंवार कोसळणारा भुईबावडा घाटाची समस्या सोडवण्यासाठी तेथील सुरक्षा कठडे रस्ते थेट काँक्रिटचे  करा अशा सुचना कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिल्या.

हा रस्ता भविष्यात पुन्हा कोसळणार नाही यासाठी ठोस "मास्टर प्लॅन" तयार करा पुढील निर्णय घ्या अशा सूचना त्यांनी यावेळी बांधकाम विभाग अधिका-यांना केल्या. श्री. पाटील यांनी आज रस्त्याची पाहणी केली.

     यावेळी करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार संगमेश कोडे, वैभववाडी तहसिलदार रामदास झळके, वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता श्री. कुलकर्णी,  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, उदय देसाई, गगनबावडा सभापती संगीता पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, पंचायत समिती सदस्या मंगल कांबळे, पांडुरंग भोसले, सरपंच दगडू भोसले, सहदेव कांबळे, चंद्रकांत खानविलकर, संभाजी पाटणकर, सार्वजनिक बांधकाम अधिकारी सारिका कुलकर्णी-जाधव, विभागीय वन अधिकारी सुधीर सोनवणे, विभागाचे कार्यकारी अभियंता संजय काटकर, गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील,  पी डी जाधव, बंडाआप्पा पडवळ, दादू पाटील आदी उपस्थित होते.

No comments