web-ads-yml-728x90

Breaking News

वरळी मधील पोलीस चौकीचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते भूमिपूजन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

मुंबईतील वरळीच्या गजबजलेल्या सेंच्युरी बाजार सिग्नल जवळ उभारण्यात येणाऱ्या पोलीस चौकीचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन करण्यात आले. महापौर किशोरी पेडणेकर यावेळी त्यांच्यासमवेत होत्या.स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या विकास निधीमधून या पोलीस चौकीचे काम केले जाणार आहे. हे काम दर्जेदार व्हावे तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या चौकीचा उपयोग व्हावा, असे श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींसह सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त आयुक्त डॉ. चव्हाण, उपायुक्त प्रणय अशोक आदी उपस्थित होते.

No comments