web-ads-yml-728x90

Breaking News

प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांच्यात सुसंवाद अत्यावश्यक – प्रसन्न जोशी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

प्रशासनात अनेक चांगले उपक्रम आणि इतरांना मार्गदर्शक कामे उभी राहतात. परंतु याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे प्रशासनाबद्दल माध्यमांत गैरसमज होतो. प्रशासनातील कार्यसंस्कृती आणि प्रसारमाध्यमे  यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. असे उद्गार साम टिव्हीचे संपादक प्रसन्न जोशी यांनी काढले.कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ कोकण भवन शाखा यांच्या विद्यामाने आज संवाद कार्यक्रम आयोजित केला होता, त्यात ते बोलत होते. यावेळी दैनिक सकाळ मुंबईचे संपादक श्री.संदीप काळे यांनीही अधिकाऱ्यांशी संवाद साधला.श्री.जोशी म्हणाले की, प्रशासनाने सोप्या पध्दतीने प्रसार माध्यमांना माहिती पुरविली तर माहितीच्या अधिकाराखाली मागविण्यात येणाऱ्या माहितीच्या अर्जांचे प्रमाण कमी होईल. प्रशासनाने पत्रकारांशी संवाद साधून त्यांना परिपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांनीसुद्धा प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुक करणेही गरजेचे आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासारख्या शासकीय खात्यांनी प्रशासन व प्रसार माध्यमांचे परिसंवादाचे कार्यक्रम यापुढेही असेच घ्यावेत. असेही त्यांनी सुचविले.

No comments