web-ads-yml-728x90

Breaking News

‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा’च्या माध्यमातून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव पुणे

झोपडपट्टीधारकांना हक्काचे व मालकीचे घर मिळाले पाहिजे, त्यांना सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त झाले पाहिजे, या करिता येत्या काळात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार पेठ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत “सदा आनंदनगर” 130  घरांचे चावी वाटप व करारनामा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, माजी महापौर प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेविका सुजाता शेट्टी, स्थायी समिती माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, वाहन व्यवहार समितीचे माजी अध्यक्ष भीमराव पाटोळे, माजी नगरसेवक बुवा नलावडे, गटनेते आबा बागुल, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, युनिक कॉन्ट्रॅक्टस् प्रा.लि.चे संचालक शेख अल्ताफ इलाहीबक्ष यांच्यासह नागरिक उपस्थितीत होते.

No comments