web-ads-yml-728x90

Breaking News

पुढच्या महिन्यात साधारण कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते नीती आयोगाचा इशारा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नीती आयोगानं व्यक्त केलाय. पुढच्या महिन्यात साधारण कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असं नीती आयोगाचं म्हणणं आहे. तिसऱ्या लाटेत दररोज चार ते पाच लाख रुग्णांची नोंद होऊ शकते, असा अंदाज नीती आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पुढच्याच महिन्यात दोन लाख आयसीयू बेड्सची गरज भासू शकते, असंही नीती आयोगानं सांगितलं आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगानं यंत्रणेला काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या आहेत. देशात पुढच्या महिन्यातच कोरोनाचं विक्राळ रुप पाहायला मिळू शकतं, असा अंदाज नीती आयोगानं व्यक्त केला आहे. नीती आयोगानं देशात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सप्टेंबरमध्ये 4 ते 5 लाख दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद केली जाऊ शकते. प्रत्येकी 100 कोरोना रुग्णांपैकी 23 कोरोनाबाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं. याच पार्श्वभूमीवर आधापासूनच 2 लाख आयसीयू बेड्स तयार ठेवण्याच्या सूचना नीती आयोगानं केंद्र सरकारला दिल्या आहेत. द इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार, नीती आयोगानं देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावानंतर रुग्णालयांत कोरोना बेड्स वेगळे ठेवण्याची शिफारस केली आहे. आयोगाचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करणाऱ्यासाठी आपल्याला आधीपासूनच तयार रहावं लाहेल. सप्टेंबरपर्यंत दोन लाख आयसीयू बेड्स तयार करणं अत्यंत आवश्यक असल्याचंही निती आयोगानं म्हटलं आहे. याव्यतिरिक्त 1.2 लाख व्हेंटिलेटर असणारे आयसीयू बेड, 7 लाख ऑक्सिजन बेड्स आणि 10 लाख कोविड आयसोलेशन केअर सेंटर असणं आवश्यक आहे. 

No comments