web-ads-yml-728x90

Breaking News

जीवाश्म इंधनाच्या कचाट्यातून भारताची सुटका;भारत होणार इंधनामध्ये स्वयंपूर्ण.!

 


BY - पंकज मोरे,युवा महाराष्ट्र लाइव – वैभववाडी

वैभववाडी तालुक्यात 'स्वच्छ इंधन-बायो फ्युएल, कॕन्सरमुक्त-केमिकलमुक्त सेंद्रिय शेती आणि कायमस्वरुपी रोजगार निर्मिती होणार (एम.सी.एल) मीरा क्लीनफ्युएल लिमीटेड, अंतर्गत केन्द्र सरकार मान्यता कायदा २००२ अॅक्टनुसार (FPO) 'वैभववाडी जैविक उत्पादक कंपनी' वैभववाडी तालुक्यात बायोफ्युएल स्टार्टअप कंपनी 'ऊर्जा क्लीनफ्युएल कंपनी व एम.सी.एल. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्वच्छ इंधन-बायो फ्युएल', कॕन्सरमुक्त-केमिकलमुक्त, सेंद्रिय शेती आणि कायमस्वरुपी 'रोजगार निर्मिती' या प्रकल्पाव्दारे होणार असल्याची माहिती एमपीओच्या संचालिका प्रगती पालांडे आणि उद्योग विकास सहाय्यक पंढरीनाथ पवार यांनी दिली.

     २००० साली एका सभेमध्ये डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी (Global Warming) जागतिक तापमानवाढ वर जैव इंधन हा उपाय  सांगितला आणि हा उपाय आपल्या भारताला इंधनामध्ये महासत्ता बनवेल, असे म्हटले होते. सदर प्रकल्पामुळे संपूर्ण तालुका इंधनामध्ये स्वयंपूर्ण करणार असून त्यामध्ये वाहतुकीचे स्वच्छ इंधन, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन,औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारे इंधन अशा आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या इंधनाची निर्मिती करणार आहे.

     जीवाश्म इंधनाला उत्तम पर्याय- हत्ती गवत पासून तयार होणारे जैव इंधन आपल्या वैभववाडी तालुक्यात तयार होणार, या प्रकल्पाची सुरूवात लवकरच आपल्या तालुक्यात होणार असून त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच हत्ती गवत शेतातच निर्माण होणार असून शेतकऱ्यांसोबत करार शेती होणार आहे आणि शेतकऱ्यांकडून हमी भावाने हा कच्चा माल विकत घेतला जाणार असल्याची माहिती एमपीओच्या संचालिका प्रगती पालांडे आणि उद्योग विकास सहाय्यक पंढरीनाथ पवार यांनी दिली.

No comments