web-ads-yml-728x90

Breaking News

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात येणारे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

 
BY - युवा महाराष्ट्र लाइव पुणे

राज्यातील निर्बंध कमी केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील काळात येणारे दहीहंडी, गणेशोत्सव व अन्य सर्व धर्मियांचे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे.पुणे विधान भवनाच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील कांबळे, आमदार राहुल कुल, आमदार चेतन तुपे, आमदार संजय जगताप, आमदार भिमराव तापकीर तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पीएमआरडीएचे व्यवस्थपकीय संचालक सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहीया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments