web-ads-yml-728x90

Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिक्कीमचे मुख्यमंत्री तमांग यांनी घेतली सदिच्छा भेट

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी येथे सदिच्छा भेट घेतली.
वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या भेटीत मुख्यमंत्री श्री. तमांग यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या समवेत पर्यटनासह अनेकविध विषयांवर चर्चाही केली.
मुख्यमंत्र्यांनी श्री. तमांग यांना महाराष्ट्र शासनाचे राजचिन्हाचे प्रतिक, पुष्पगुच्छ, हिमरू शाल तसेच ‘महाराष्ट्र देशा’ या त्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे पुस्तक देऊन स्वागत केले.मुख्यमंत्री श्री. तमांग यांनी श्री. ठाकरे यांना सिक्कीमची शाल भेट म्हणून दिली. याप्रसंगी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव एस. टी. ढाकल, पर्यटन सचिव कुलदीप छेत्री आदी उपस्थित होते.

No comments