web-ads-yml-728x90

Breaking News

पोलीस शिपाई २०१८ मधील भरतीची प्रक्रिया पूर्ण

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

पोलीस शिपाई भरती 2018 मधील प्रतीक्षा यादीतील महिला उमेदवाराने नियुक्तीबाबत तिच्यावर व अन्य 800 उमेदवारांवर अन्याय होत असून आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागेल असे निवेदन समाजमाध्यमावर केले आहे. त्याबाबत गृह विभागामार्फत पोलीस शिपाई भरती 2018 मधील भरतीची सर्व पदे भरण्यात आली असल्याने प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांचा नियुक्तीसाठी विचार शक्य नाही, असे गृह विभागामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

पोलीस शिपाई भरती २०१८ – वस्तुस्थिती

पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक (लोहमार्गासह) यांचे आस्थापनेवरील / समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक १ ते ११ व १३ ते १६ यांचे आस्थापनेवरील तसेच सशस्त्र पोलीस शिपाई यांची (पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई यांची) रिक्त असलेली ६१०० पदे भरण्यासाठी mahapolice.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०५/०२/२०१८ ते दिनांक २८/०२/२०१८ रोजी अर्ज मागविण्यात आले होते. सदर भरती प्रक्रियेत एकूण १०,७४,४०७ एवढ्या उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. सदर भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी व लेखी परीक्षा या क्रमाने परीक्षा घेऊन घटक प्रमुखांच्या आस्थापनेवर रिक्त असलेली ६,१०० पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रकरणी संबंधित घटक प्रमुख हे नियुक्ती प्राधिकारी असल्याने त्यांच्या स्तरावर प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली होती व ज्या उमेदवारांनी काही कारणास्तव नियुक्ती नाकारली होती त्यांच्या रिक्त पदावर प्रतीक्षा यादीतील त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या असून याप्रकारे एकूण ४५६ प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.

No comments