web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड तालुक्यातील मटका तेजीत वसुली वाझे कोण

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

महाराष्ट्रात पोलिसाकडुन अवैध धंदयावाल्याकडुन बार वाल्याकडुन कोटी रूपये जमा करण्याचा टप्पका पोलिस महासंचालक गृहमंत्री यांच्यावर झाला वसुली वाझे त्यातुन बाहेर आले असताना पोलिसाच्या हप्ते बाजीने मुरबाड शहरातील मातानगर बाजारपेठात तसेच धसई सह तालुक्यात मटका धंदा तेजीत सुरू आहे.

मटका म्हणजे दारूडे गुन्हेगार यांचा अडडा समजला जात होता मात्र आजकाल जेष्ठ नागरिकासह तरूणांचा छंद बनला आहे.त्यामुळे चोया दरोडे अशा गुन्हयात वाढ होत असुन मटका धंदा कायमचा बंद होईल का? अस सवाल नागरिक महिलावर्ग करत आहे.आतातर मटका वाल्यातही गु्रप रंगतात पोलिस अशा किती धंदयावाल्याना स्पर्धेत टाकून वाझे वसुली करतात त्याला सिमाच राहिली नाही.मटक्यात हरणाराही दारू पितो आणि जिंकणाराही वॉईनशॉप देशीबारमध्ये दारू घेवुन रस्त्यावर बाटल्या फोडतो अंडी खातो हा काय पोटभरण्याचा धंदा आहे काय? असा सवाल महिलावर्ग करत आहे.

राजकीय अर्शिवादाने असे धंदे चालतात मात्र पोलिसाना माहिती असताना कारवाई का होत नाही लाखो पर्यंत हप्ता पोलिसाना मिळत असेल तर पोलिस मटका कसे बंद करणार एक मात्र खर ज्या विधवा महिलाचे कन्यादान स्थानिक आमदार करतात शासन त्यांना निराधाराचा लाभ देतो त्यापेक्षा मटका जुगार अवैध धंदे बंद केल्यास मृत्युचा प्रवास थांबेल चोर्या मार्या हाणामार्या दरोडे गुन्हेगारी थांबेल सरकारने तात्काळ अशा मटका किंगच्या मुसक्या आवळाव्यात अशी मांगणी महिलावर्ग करत आहे.

No comments