अलगुज
कानी साद घालती
गाण्याच्या दुनियेत जणू
आपणास घेऊन जाती
अलगुजाचे मधुर नाद
मैत्रीचा प्रस्ताव ठेवती
गोडबोलीचे नेट विणूनी
प्रेमात ट्रॅप करती
अलगुजाचे मधुर नाद
स्वतंत्र विश्व निर्माण करती
फक्त आम्हीच दोघे
असा विश्वास देती
अलगुजाचे मधुर नाद
प्रथम आनंद भरती
नंतर दुराव्याच्या खाडीत लोटून
विरहाचे चटके सहती
अलगुजाचे मधुर नाद
मनात कंप उठवती
आठवणींचे हळवे क्षण
ह्रदयाच्या कप्प्यात साठवती
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
No comments