web-ads-yml-728x90

Breaking News

माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी संस्थात्मक कार्य उभे रहावे – विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

फलटण एज्युकेशन सोसायटी आणि मुधोजी हायस्कूल यांचे शिक्षण प्रसाराचे कार्य शंभरपेक्षा अधिक वर्षापासून अव्याहतपणे सुरु आहे. शालांत परीक्षा 1990 तुकडीच्या उल्लेखनीय कार्यातून सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन माजी विद्यार्थी संघटनेची उभारणी करावी, अशा संस्थात्मक कार्य उभारणीतून नव्या पिढीचे भविष्य घडविले जावे, संकटग्रस्तांचे अश्रू पुसले जावेत आणि गरजवंताना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्री.रामराजे नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केली.विधानभवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती, श्री.रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या शुभहस्ते मुधोजी हायस्कूल, तालुका फलटण जि. सातारा येथील 1990 च्या इयत्ता 10 वी तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संस्थेने, आपापल्या क्षेत्रात उच्चपदावर पोहोचलेल्या सह-अध्यायींचा सत्कार आयोजित केला. त्याप्रसंगी सत्कारमूर्ती आणि उपस्थितांना संबोधित करतांना सभापती श्री.रामराजे नाईक- निंबाळकर बोलत होते. विधानभवनातील, मध्यवर्ती सभागृहात आयोजित या कौटुंबिक परंतु आगळ्यावेगळ्या समारंभामुळे उपस्थित फलटणकरांसह सर्वांच्याच मनात आनंदाचा ठेवा बनून राहिलेल्या शालेय जीवनातील स्मृतींना उजाळा मिळाला.

No comments