web-ads-yml-728x90

Breaking News

सर्तक पोलिस यंत्रणेमुळे त्या दाम्पत्याला मिळाले हरविलेले सोन्याचे दागिने;पोलिस यंत्रणा व रिक्षा चालक यांचे कौतुक

 


BY - गौरव शेलार,युवा  महाराष्ट्र  लाइवमुरबाड,ठाणे

आपण नेहमी आपल्या मुलाबाळांच्या प्रपंचाचे विचार करत कमविलेल्या पैसातुन सोनं दागिने खरेदी करतो कारण हाच सोनं आपल्याला अडीअडचणीस उपयोग पडतो आपण आपला हा कष्टातुन कमविलेला सोंन दागिने जर कुठे गहाळ झाले तर आपल्या आंगाची लाई लाई होते. 

    असाच काहीसा प्रकार मुरबाड मध्ये घडला आहे.मुरबाडकडे प्रवास दरम्यान एका दाम्पत्याचे सोन्याचे दागिन्याची बॅग हि रिक्षात राहुन गेली होती.मात्र दक्ष रिक्षा चालक पोलिस यंत्रणा यांच्या दक्षतेमुळे या दाम्पत्यांना त्यांचे दागिने काही तासाभरातच मिळाले.मुरबाड तालुक्यातील वांजळे येथील रहिवासी दिपक लाटे त्यांची पत्नी नुतन दिपक लाटे हे दांपत्य दिनांक 4 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास मुरबाड येथे येण्यासाठी रिक्षा क्रमांक एमएच 05 बीक्यू 2510 रिक्षा चालक देविदास शिंगोळे यांच्या रिक्षातुन प्रवास केला.

 यावेळी त्यांच्या सोबत कपडे चारतोळे सोन्याचे मंगलसुत्र अन्य दागिने असे सुमारे दोन ते अडीच लाखांचे ऐवज असलेली एक बॅग रिक्षात विसरले मात्र काही क्षणातच लाटे यांना ही बाब लक्षात आल्या नंतर त्यांनी तात्काळ मुरबाड तिन हात नाका येथील पोलिस चौकीवर धाव घेतली सदरचा सर्व प्रकार पोलिस नाईक विजय गांजले यांना सांगितला.पोलिस नाईक गांजले यांनी तात्काळ सीसीटीव्हीच्या साहाय्याने रिक्षाचा शोध सुरू केला असता सरळगाव येथील दक्ष स्थानिक रिक्षा चालक देविदास शिंगोळे यांनी पोलिस नाईक गांजले यांना सांगितले की सदरील बॅगमधील मुद्देमाल सुरक्षित असल्याची खात्री करून लाटे दांपत्यांच्या स्वाधीन केले. 

  सदरील सर्व प्रकार मुरबाड पोलिस स्टेशनचे दक्ष कतृत्व कोविड योध्दा वरिष्ठ पोलिस निरिक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने हा प्रकरण मार्गी लावण्यात आले.घटनेचे तात्काळ दखल घेतल्याने एका दांपत्यांच्या जिवनाला लाखमोलाचा आधार परत मिळवुन दिल्याने दक्ष पोलिस यंत्रणा दक्ष स्थानिक रिक्षा चालक यांचे तालुक्यातुन सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 

No comments