कवी संदीप गणपती कांबळे यांना"शब्दरत्न" पुरस्कार प्रदान
BY - युवा महाराष्ट्र लाइव – शहापूर
कल्याण तालुक्यातील अजिंक्य अकॅडमी टिटवाळा या संस्थे तर्फे दिला जाणारा"शब्दरत्न पुरस्कार २०२१" या वर्षी भिवंडीतील प्रसिद्ध कवी संदिप गणपती कांबळे यांना प्राप्त झाला आहे. १५ आगष्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, शासनाचे सर्व नियम पाळून. शहापूर तालुक्यातील वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या प्रसंगी वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक ह. भ. प. कैलाश महाराज निचीते आणि व्याख्याते शिवाजीराव सातपुते यांना "जीवन गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.. या प्रसंगी अजिंक्य अकॅडमी चे एन . ए. कदम, मुख्याध्यापक ,कवी माधव गुरव, दामोदरे, भोईर, तर आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments