web-ads-yml-728x90

Breaking News

एकच झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही - मुख्यमंत्री

 

BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केले की भीती वाटते. तो डायलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता. पण, अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत, यापुढेही देऊ. आम्हाला धमकी देऊ नका, आम्ही एकच अशी झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचे बांधकाम होणार आहे. याचा शुभारंभ रविवारी (दि. 1 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जांभोरी मैदानात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार शरद पवार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

No comments