web-ads-yml-728x90

Breaking News

धान खरेदी केंद्राची संख्या वाढवून धान खरेदीचे योग्य व्यवस्थापन करावे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

धान खरेदी केंद्राची संख्या या हंगामात वाढवून धानखरेदी वेळेवर करा. धान खरेदी व धानभरडाई प्रक्रियेबाबत अंदाजित वेळापत्रक तयार करून वेळापत्रकाप्रमाणेच प्रक्रिया पार पडेल अशी खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत  राज्यात खरेदी करावयाच्या धान व भरड धान्य खरेदी पूर्व नियोजनाची मंत्रालयातील परिषद सभागृहात बैठक झाली. अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला दूदरदृश्यप्रणालीद्वारे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे सचिव विजय वाघमारे,महाराष्ट्र राज्य सहकारी व पणन महासंघ लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग,सर्व विभागांचे पुरवठा उपायुक्त तसेच दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.श्री.भुजबळ म्हणाले, धानाची प्रतवारी व इतर बाबीसाठी शासनस्तरावर राज्यस्तरीय भरारी पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकाकडून प्रत्यक्ष स्थळी भेट देवून सर्व बाबींची तपासणी केली जाईल. या पथकाला तपासणीदरम्यान गैरप्रकार आढळल्यास सर्व संबंधितावर कडक कारवाई  करण्यात येईल.पणन हंगाम 2020-2021 मध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाकडून घेण्यात आले होते. ऑनलाईन सातबारा, बाहेरील राज्यातून धान येणार नाही यासाठी राज्याच्या सिमा सिल करणे, धानाची गुणपत्ता यंत्रणेमार्फत तपासून घेणे, धानापासून तयार होणाऱ्या सिएमआरचे गुणवत्ता नियंत्रणेमार्फत गुणवत्ता तपासणी करून घेण्यात आले आहे. याप्रमाणेच आताही धान खरेदी करताना या निर्णयांची अमंलबजावणी केली जावी.

 

No comments