web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड तालुक्यातील येणारा रॉकेल गायब शासनाच्या ऑनलाईन यादीत मुरबाडचा समावेश

 


BY - गौरव शेलार,युवा  महाराष्ट्र  लाइवमुरबाड,ठाणे

मुरबाड तालुक्यात रेशन धान्याबरोबर काही लाभार्थींना रॉकेलचा पुरवठा शासनाकडून होत आहे परंतु मुरबाड तहसिल पुरवठा विभागाकडून तो लाभार्थींला मिळाला की नाही याची माहिती गुलदस्त्याच्या उंबरठ्यावर आहे.सध्या बदलीचे सत्र सुरु असून जाता - जाता रेशन दुकान,रॉकेल दुकानदाराचे भलं करायला घेतले की काय ? अशी चर्चा आहे.या महिण्याचे दोन धान्य आले.एक म्हणजे मोफत व दुसरे म्हणजे खरेदीचे.त्याचबरोबर मुरबाड तालुक्यात नियमाने दरमहा ११०० लिटर रॉकेल येतो त्यातच तो रॉकेल नेमकी त्या लाभार्थीं पर्यंत पोहोचतो का असा प्रश्न पुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी गुलदस्त्यात ठेवला आहे. ऑगस्ट महिण्यात शासनाच्या नलाईन साईटवर रॉकेल (केरोसीन) आला असून लाभार्थीच्या SRC नंबर समोर माहिती उघड झाली आहे परंतु काही लाभार्थीच्या घरात ते रॉकेल अजूनही पोहोचले नाही मग हा रॉकेल कोणाच्या घशात घातला याचे उत्तर पुरवठा विभाग मुरबाड यांनी प्रत्येक दुकानदाराला विचारले पाहिजे.अधिकारी वर्गाला प्रत्येक दुकानदाराचे हप्ते असून धान्य मंजुरी करिता २००,५०० ची नोट अधिकारी वर्ग घेतात.कोणी काही करु शकले नाही तर धान्याच्या मंजुरीला कारणे सांगत दिरंगाई केली जाते.अनेक लाभार्थींला धान्य देतो की नाही,मग वेळेवर दिला जातो का ,की धान्याचा साठा गोडावून / दुकानातच पडून आहे याच्याशी पुरवठा विभाग अधिकाऱ्याला काही देणंघेणं नसते,यांचे हप्ते बांधले असल्याने लाभार्थीच्या तक्रारीला दाद मिळत नाही.एखाद्याच्या तक्रारीवर पंचनामा करण्याचा देखावा करुन तक्रारीला उडवा उडवीची उत्तरे देऊन त्यातही दुकानदाराला वाचवितात,वरिष्ठ अधिकारी याकडे कानाडोळा करुन अधिकाऱ्याला वाचवून दुकानदाराचा पाठीराखा होतो.परंतु लाभार्थी रेशनधान्य व रॉकेल पासुन वंचितच राहतो याकडे थेट राज्याचे पारदर्शक मुख्यमंत्री,अन्न पुरवठा मंत्री यांनी लक्ष वेधून स्वंतत्र पथक नेमावे व मुरबाड तालुक्यातील लाभार्थी यांच्याशी संवाद साधून घटनास्थळी पाहणी करुन तात्काळ पुरवठा विभाग अधिकारी,रेशनधान्य दुकानदार यांचेवर कारवाई करुन अधिकाऱ्याला निलंबीत व दुकानदाराचे परवाने रद्द करावे अशी मागणी होत  आहे.

No comments