web-ads-yml-728x90

Breaking News

भिवंडी उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांना नोकरीतुन बडतर्फ करा स्वतंत्र संपादक पत्रकार संघाची राष्ट्रपती,राज्यपाल यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे मांगणी

 


BY - गौरव शेलार,युवा  महाराष्ट्र  लाइवमुरबाड,ठाणे

शासनाच्या गुरचरण 100 एकर जागेत बेकायदेशीर दगडखाणी खोदुन लाखो ब्रॉस दगड माती उत्खन्न करणार्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्या तात्कालीन भिवंडी उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांना नोकरीतुन बडतर्फ करावे त्यांना पदोन्नोती देवु नये अशी लेखी तक्रार स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवजी शेलार यांनी राष्ट्रपती,राज्यपाल यांच्याकडे केली आहे.या सरकार जमिनीवर दगडखाणीची वसुली करणारा वाझे कोण याचीही चौकशी करावी अशी मांगणी केली आहे.

   भिवंडी तालुक्यातील तलाठी सजा आमणे तसेच तळवली येथील भादाणे आतकोली पठारावरील 100 एकराच्यावर सरकारी जागेत राजरोस दगडखाणी सुरू होत्या त्याची तक्रार महाराष्ट्र शासनाच्या मंत्री अधिकार्याकडे केली असताना उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांच्यावर कारवाई करता महसुल विभागाचा वसुली वाझे म्हणुन वापर केला.कर्तव्यात बेजबाबदार पैशाने कामे करणारा मोहन नळदकर याच्या दुर्लक्षतेने आमच्या खाजगी जमिनीत शेतीवर जाण्यास रस्ता नाही खाजगी जमिनीत बेकायदा दगडखाणी खोदुन आमच्या जमिनीचा कोटी रूपायाचा नुकसान केला आहे.त्याला तात्कालीन मोहन नळदकर उपविभागीय अधिकारी जबाबदार आहेत. 

      कारण आम्ही तक्रारी केल्या असताना त्याची दखल त्यांनी घेतली नाही केवळ पैसा कमवणे हाच बेजबाबदार अधिकार्याचा धंदा असल्याने सामान्य शेतकरी भयभित झाले आहेत.सावकार श्रीमंत योगी याची वकीली करणार्या मोहन नळदकर यांनी केलेल्या कारनाम्या विरोधात आम्ही हायकोर्ट सुप्रिमकोर्टात जाणार आहोतच मात्र त्यापुर्वी झोपलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी त्याचा वसुली वाझे याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही राष्ट्रपती, राज्यपाल,पंतप्रधान यांच्याकडे न्याय मागणार आहोत.महाराष्ट्र सरकार महसुल अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्यात मोठी बोली लावतात वसुली वाझे कडुन सरकारी जमिनी पैशावाल्याच्या घशात घालतात दगडखाणीना प्रोत्सहान देतात त्याचा गोरगरीब शेतकरी स्थानिक गावकर्यांवर मोठा परिणाम झाला आहे.

 

No comments