web-ads-yml-728x90

Breaking News

प्रतिकूल परिस्थितीवरही जिद्दीच्या जोरावर मात करता येते – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राज्यातील बालगृहातील 209 विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इयत्ता 12 वी) उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश मिळवले आहे. कौटुंबिक प्रेम आणि सुरक्षित वातावरण हेच यश मिळवण्यामागचे गमक असते असे नाही तर जिद्द आणि शिक्षणाची ओढ असल्यास प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीच्या जोरावर मात करता येते हे या मुलांनी दाखवून दिले आहे, अशा शब्दात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या बालकांचे कौतुक केले आहे.राज्यातील विविध कारणास्तव काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीकडे सादर केली जातात. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर या बालकांना बालगृहात तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना (चाईल्ड इन कॉन्फ्ल‍िक्ट विथ लॉ) पुनर्वसनाच्या दृष्टीने अनुरक्षण गृहात दाखल करण्यात येतात. या मुलांच्या पालन पोषणासह शिक्षण तसेच सर्वांगीण विकासासाठी सर्व त्या सोयीसुविधा शासन पुरवते.अनाथ, निराधार बालके, एक पालक असलेली, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहीत मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे आदी कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एच.आय.व्ही.ग्रस्त / बाधित बालके, पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील बालके, कामगार विभागाने सुटका केलेले आणि प्रमाणित केलेले, शाळेत न जाणारे बाल कामगार आदींना बालगृहात ठेवले जाते. या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाची जबाबदारी आणि काळजी विभागामार्फत घेतली जाते. त्यासाठी या मुलांना शालेय तसेच उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि मदत केली जाते.

 

No comments