web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोना संकटात अर्थचक्र गतिमान ठेवणाऱ्या उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

संपूर्ण देश कोरोनाच्या संकटात असताना उद्योजकांनी नेटाने अर्थचक्र सुरु ठेवले. अनेक उद्योगांनी कामगारकपात तसेच वेतनकपात न करता दुपटीने काम केले. कोरोनासारखी संकटे येतात. मात्र सर्वांनी अंतःकरणपूर्वक काम केले तर देशाला कुठल्याही संकटावर मात करता येईलअसे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. 

कोरोना काळात अर्थचक्र गतिमान ठेवणाऱ्या राज्यातील ५१ उद्योजकांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि.२३) राजभवन येथे सत्कार करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते.

मुंबई तरुण भारत तर्फे आयोजित या कोविड योद्धा उद्योजक सन्मान’ सोहळ्याला मुंबई तरुण भारतचे मुख्य संपादक किरण शेलार व व्यापार पणन प्रमुख रविराज बावडेकर व्यासपीठावर उपस्थित होते. 

No comments