web-ads-yml-728x90

Breaking News

कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रस्तावित नवीन योजनेसंदर्भात सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली आढावा बैठक

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी प्रस्तावित योजनेसंदर्भात  सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमारउपसचिव का.गो.वळवी, पणन संचालक सतीश सोनी, व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवारसहसंचालक विनायक कोकरेसंबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण, विक्रीयोग्य उत्पादनांच्या प्रभावी हाताळणी आणि व्यवस्थापनासाठी विपणनाच्या पायाभूत सुविधांचा विकासशेतमालाची साफसफाईप्रतवारी करुन तात्पुरती साठवणूकफळेभाजीपाला व फुले यासारख्या नाशवंत मालाचे आयुष्य व दर्जावाढ, काढणी-पश्चात आणि आणि हाताळणी दरम्यान होणारे नुकसान कमी करुन अंतिमत: शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणेबाजार समितीसाठी नविन उत्पन्नाचे स्त्रोत निर्मिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

No comments