web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यपाल व माजी सैनिक कल्याण मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिकांचे पुनर्वसन व पुनर्स्थापना यासाठीच्या विशेष निधी (महाराष्ट्र) समितीची 49 वी वार्षिक बैठक राजभवन येथे झाली. सैनिक कल्याण विभागाच्या राज्यातील विविध मालमत्तांचे व्यवस्थापन, ध्वज निधीचा विनियोग, सैनिक विद्यार्थी वसतीगृहांची सद्यस्थिती व सोयीसुविधा आदी विषयांबाबत यावेळी चर्चा झाली.बैठकीला कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, महाराष्ट्र, गोवा व गुजरात प्रभागाचे प्रमुख मे.जन. राकेश मनोचा, रिअर एडमिरल अतुल आनंद, सैनिक कल्याण संचालक व इतर अधिकारी उपस्थित होते.

No comments