web-ads-yml-728x90

Breaking News

सामाजिक कार्यकर्ते सुनिल नारकर, रुपेश सावंत यांचा पुरग्रस्तांना मदतीचा हात

BY - पंकज मोरे,युवा महाराष्ट्र लाइव – वैभववाडी

कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतोय तोपर्यंत चिपळूण, महाड परिसरात गुरूवारी अचानक आलेल्या महापुरामध्ये महाड रहिवासियांचे अतोनात नुकसान झाले. घरात साठलेला चिखल त्यामुळे रहिवाशांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तसेच तळीये गावामध्ये दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत भुईबावडा गावचे सुपुत्र युवा उद्योजक सुनिल नारकर आणि रुपेश सावंत यांनी तब्बल ५ लाख रुपयांपेक्षा जास्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

     गुरुवार हा वार चिपळूण महाडवासियांना काळरात्र ठरला. क्षणात होत्याच नव्हत झाल. अनेकांचा संसार उजाड झाला. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत भुईबावडा गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक सुनिल नारकर आणि रुपेश सावंत यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यांनी तब्बल ५ लाख रुपयांपेक्षा जास्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. सुमारे ५०० कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

     यामध्ये तांदूळ, डाळ, वाटाणा, मसूर, साखर, चहा पावडर, गरम मसाला, चटणी पावडर, हळद पावडर, मॕग्गी, साबण, माचीस, मेणबत्ती, खाद्यतेल, कांदे, बटाटे, पाणी ५०० बॉक्स, बिस्कीट, चटई, साड्या, गाऊन, लहान मुलांचे कपडे आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.

     यावेळी प्रकाश मोरे, अजिंक्य नारकर, श्रीधर जाधव, रोशन धुमाळ, सुरेश मोरे, राम गुप्ता, प्रदीप राणे, मंदार राणे,अक्षय मोरे, सुरज मोरे, प्रणव म्हात्रे, बबलू म्हात्रे, रवींद्र चव्हाण, सुधाकर करंबळे,अशोक आरोळकर, सुरज घाडीगांवकर,  कोळंबकर, घनश्याम राणे, विनोद सकपाळ, शिवळकर, विनोद घरत, विकास परब, सुहास परब, प्रियांका चव्हाण, प्रथमेश जाधव, अमोल परब आदी उपस्थित होते. यावेळी तेथील नागरिकांना अश्रू अनावर झाले. आजपर्यंत आम्हांला एवढी मोठी कोणी मदत केली नाही. तुम्ही आम्हांला मदत केली आहे. तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नसल्याचे पुरग्रस्तांनी सांगितले. यावेळी समाजसेवक सुनिल नारकर यांनी संकट कोणावरही येवू शकते. तुम्ही खचून जावू नका. तुम्ही मला कधीही हाक द्या. सदैव तुमच्या पाठीशी मी उभा राहिन असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते सुनिल नारकर आणि खारेपाटणचे सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments