web-ads-yml-728x90

Breaking News

पोलिस प्रशासनाच्या कुचकामी यंत्रणेमुळे न्याय मिळत नसल्याने लालसिंग पुरोहित यांचा मंत्रालयासमोर आत्मदहणाचा इशारा


BY : युवा महाराष्ट्र लाईव - मुंबई।

वाशी येथील सेक्टर २८ झी मोटर्स चा मालक खुर्शीद कुरेशी यांनी बँक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून भंगार मध्ये काढलेली गाडी  जिचा इन्शुरन्स सुद्धा नव्हता ही गाडी आम्हाला  विकुन आमच्या कुटुंबाची फसवणूक करून आम्हाला आर्थिक आणि मानसिक नुकसान पोहचवणाऱ्या खुर्शीद कुरेशी आणि ICICI बँक कर्मचारी यांच्या विरुद्ध माझ्या मुलाने पोलिस प्रशासनास दिनांक- २२/०७/२०२१ रोजीचे पत्र व या अगोदर अनेकवेळा पत्र लिहून पोलिस प्रशासनास लेखी तक्रार दिली होती,पण माझ्या मूलाच्या तक्रारी अर्जावर आजवर कोणतीही कार्यवाही झाल्याचे माझ्या निदर्शनास आले नाही अथवा पोलिस प्रशासनाकडून ही कोणतीही माहिती देण्यात आली नाही.लेखी स्वरूपात तक्रार करूनही कोणतीच कारवाई न झाल्यामुळे आमची फसवणूक करणारा सदर इसम अजूनही मोकाट असून आजवर आमच्या सारख्या कित्येक लोकांना फसवण्याचे काम करीत असेल,कारण त्यास कोणत्याही प्रकारचा कायद्याचा धाक नाही. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणात जाणून बुजून दुर्लक्ष करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या इसमास पोलीस प्रशासनाचा वरदहस्त आहे असे निदर्शनास येत आहे.

           माझ्या मुलाची फसवणूक करणारे खुर्शीद कुरेशी व आमची फसवणूक करण्यात जबाबदार असणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर तसेच तपास अधिकारी सपोनी.श्री दिपक शिखरे यानी गुन्हा दाखल न करता उलट त्यावर मला फ़सवनाऱ्या खुर्शिद कुरेशी यास पोलिस स्टेशन मधे बोलाऊन मला पैसे देनार लोन क्लोज़ करनार,गाडी आहे तशी द्या खुर्शिद ला तुम्हाला पैसे परत मीळणार!!असे आश्वासन देऊन माझी दिशाभूल करुन मला पोलिस स्टेशन ला मानसिक त्रास देनाऱ्या बेजबाबदार अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तर  जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे,या बाबतचे निवेदन देण्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे दिनांक २४/०८/२०२१ रोजी गेलो असता जिल्हाधिकारी यांची काही कारणास्तव भेट मिळाली नाही.त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील रायटर मॅडम यांनी आम्हास तहसीलदार साहेबांस निवेदन देण्यास सांगितले त्यानुसार आम्ही तहसीलदार श्री.राजेंद्र चव्हाण यांना निवेदन देण्यास गेलो असता मी माझ प्रकरण त्याना सांगीतल त्यानंतर तहसीलदार यांनी निवेदन घेताना फोटो काढण्यास नकार दिला तसेच या प्रकरणात मी तुमची काहीही मदत करू शकत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.

          मला पोलीस प्रशासन न्याय देत नाही,काहिही कारणास्तव जिल्हाधिकारी यांची भेट मिळत नाही,तहसीलदार साहेब सांगतात यात मी काहीच करू शकत नाही मग मला न्याय कोण मिळवून देणार? 

           या देशात कायदा सुव्यवस्था अस्तित्वातच नाही आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना कोणीच न्याय मिळवून देत नाही,त्यामुळे या सर्वांला कंटाळून माझा मुलगा लक्ष्मण रागाने गावाला निघून गेला आहे. माझ्या मुलाला असा हताश निराश असहाय्य झालेला एक बाप म्हणून मला बघवत नाही व माझीही परिस्थिति खराब झाली आहे.त्यामुळे मी या निष्क्रिय सरकारी यंत्रणेचा निषेध म्हणून मंत्रालया समोर आत्मदहन करणार आहे.

No comments