web-ads-yml-728x90

Breaking News

भिवंडीत ओला चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या

BY - युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी

एका ओला चालकाची कारमध्येच अज्ञात आरोपीकडून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील मुबंई-नाशिक महामार्गावरील माणकोणी नाका येथील पूलाखाली भर चौकात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. प्रभाकर गंजी (वय,४३रा. कन्हेरी, भिवंडी ) असे हत्या झालेल्या ओला चालकाचे नाव आहे.मृतक प्रभाकर हा भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातील एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. मात्र लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने कुटूंबाच्या उपजिवेकीसाठी ओला कारवर गेल्या एक ते दीड महिन्यापासून कार चालक म्हणून कार्यरत होता. त्यातच ३१ जुलै रोजी दुपारच्या सुमारापासून मृतक प्रभाकरची कार मुबंई-नाशिक मार्गावरील माणकोली नाक्यावरील पुलाखाली उभी होती. बराच वेळ झाला कारमध्ये चालक ड्रायव्हर सीटवरच जागचा हलला नसल्याने काही स्थानिक नागरिकांना त्याचा संशय आला. त्यामुळे चौकात तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांना घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्याने पोलिसांनी कारजवळ जाऊन पहिले तर प्रभाकर मृत अवस्थेत दिसला. त्यां नतर स्थानिक नारपोली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बीट अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक  विजय शिरसाठ व पोलीस  पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून प्रभाकराचा मृतदेह शव विच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. या गुन्ह्याचा अधिक तपास नारपोली पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षिक (गुन्हे) राजेश वाघमारे करीत आहेत.

No comments