web-ads-yml-728x90

Breaking News

रायगड जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी निभावला शेजारधर्म

 


BY -  आशिष चौधरी ,युवा महाराष्ट्र लाइवरायगड

पोलादपूर -प्रतापगड रस्ता खुला झाल्यामुळे आज जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके व पेण उपविभागीय अधिकारी श्री. विठ्ठल इनामदार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रतापगडाच्या पायथ्याशी (ता.महाबळेश्वर,जि. सातारा) असलेल्या गावकऱ्यांना भेटून त्यांना 1 हजार 200 अन्नधान्य किट दिले. तसेच  पोलादपूर,जि.रायगड वरून आणखी 10 हजार तयार जेवणाचे पॅकेट्स  प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावातील गावकऱ्यांसाठी पाठविण्यात आले आहेत. 

     प्रतापगडाच्या पायथ्याशी 35 गावे असून सुमारे 2 हजार कुटुंब आहेत. अतिवृष्टीमुळे प्रतापगड पायथा ते महाबळेश्वर रस्ता मागील 7-8 दिवसापासून बंद असल्यामुळे या गावकऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता. मात्र रायगड जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन रस्ता मोकळा करण्याचे काम केले आणि संपर्क तुटलेल्या गावांशी पुन्हा संपर्क साधण्यात यश मिळविले.

    या गावकऱ्यांनी रायगड जिल्हा प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.

No comments