web-ads-yml-728x90

Breaking News

स्वतंत्र कला विद्यापीठासाठी बॉम्बे आर्ट सोसायटीने पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राज्यात कलेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे ही आपली सुरुवातीपासूनची इच्छा असून हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी दि बॉम्बे आर्ट सोसायटीने पुढाकार घ्यावा, त्यास शासन पूर्ण सहकार्य  करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.दि बॉम्बे आर्ट सोसायटी आयोजित कलर्स ऑफ इंडिपेंडन्स: ७५ इयर्स ऑफ आर्ट या ऑनलाईन कला प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य अशाच सुंदर रंगाने बहरत जावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी होत असताना दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे नाव मुंबई आर्ट सोसायटी असं केलं जावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष रामदास फुटाणे, सचिव चंद्रजित यादव यांच्यासह विविध देशातील, भारताच्या विविध 29 राज्यातील आणि महाराष्ट्रातील कलाकार व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात चित्र, शिल्प, मुद्राचित्र, फोटोग्राफी, व्हिडिओ इन्स्टॉलेशन यासारख्या 5 कलाप्रकारातील 1645 कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन १५ ऑगस्ट ते ३० डिसेंबर २०२१ या काळात ऑनलाईन पद्धतीने बॉम्बे आर्ट सोसायटीच्या संकेतस्थळावर पाहता येईल.

No comments