web-ads-yml-728x90

Breaking News

परदेश शिष्यवृत्ती योजनेत आणखी ५० जागा याच वर्षी वाढविण्यात येणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी संख्या 75 वरून वाढवून 200 पर्यंत करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून, आणखी 50 जागांची वाढ याच वर्षीपासून करण्यात येईल तसेच याच शैक्षणिक वर्षात त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

परदेश शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात विद्यार्थ्यांनी मागणी केलेल्या काही निकषात सुधारणा करण्यासंबंधी सह्याद्री अतिगृह येथे श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, सह सचिव दिनेश डिंगळे, आयुक्त प्रशांत नारनवरे यांसह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.कला शाखेतील फाईन आर्ट्स, फिल्म मेकिंग, ऍनिमेशन, डिझाईन आदी विषयात परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयात शिक्षण देणारी महाविद्यालय जागतिक क्यू एस रँकिंग च्या 300 मध्ये येत नसल्यामुळे लाभ मिळत नव्हता. त्यामुळे क्यू एस रँकिंग सोबतच क्यूएस पब्लिकेशनकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सब्जेक्ट रँकिंगचा पर्याय ग्राह्य धरण्यात यावा, कला शाखेतील विद्यार्थ्यांनाही या योजनेतून लाभ देता यावा, या अनुषंगाने निकषात बदल करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले आहेत.

No comments