web-ads-yml-728x90

Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे हिरो – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे गौरवोद्गार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे

आपल्या राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून  आलेले आहेत. त्यांनी मोगल साम्राज्याचा शेवट करत युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम साधून राज्य केले. देशात एक प्रकारची नवीन चेतना निर्माण केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे ‘हिरो’ आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी किल्ले सिंहगडाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ता टिळक, राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहने, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments