web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोना काळातही महाराष्ट्रात सुपोषणाचे तरंग

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

कोरोना महामारीचे संकट राज्यावर अजूनही घोंगावत आहे मात्र या काळातही बाल संगोपन आणि सुपोषण नियमितपणे आणि सुयोग्यरित्या व्हावे यासाठी राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत अविरत प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राबविल्या गेलेल्या ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ या मोहिमेमुळे लाखो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. व्हाट्सअप चॅट, प्रत्यक्ष फोन याद्वारे हजारो लाभार्थ्यांनी माहिती घेऊन समुपदेशन आणि इतर बाबींचे योग्यरित्या नियोजन केले आहे त्यामुळे आता तरंग सुपोषणाच्या माध्यमातून 8080809063 हा मोबाईल क्रमांक परवलीचा क्रमांक ठरला आहे.‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात ‘आयव्हीआर हेल्पलाइन’, व्हाट्सअप चॅट बोट, ब्रॉडकास्ट फोन आणि संदेश प्रणाली तसेच ‘एक घास मायेचा’, ‘आजीबाईच्या गुजगोष्टी’ या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.  महामारीच्या काळातही संभाव्य लाभार्थ्यांशी संवाद सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाचा ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा एक उत्कृष्ट डिजिटल उपक्रम आहे. टॅली न्यूट्रिशनच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे कारण आपण आपल्या एका बोटाच्या क्लीकवर पोषण आणि मुले, गर्भवती महिला, स्तनपान करणारी माता आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याशी संबंधित माहिती मिळवू शकता. वयानुसार पोषण समुपदेशन सीडी आणि प्री स्कूल ईसीसीई उपक्रमाद्वारे मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी घरी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हे व्यासपीठ अत्यंत प्रभावी म्हणून काम करीत आहे, अशी प्रतिक्रिया या विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन यांनी व्यक्त केली आहे.

No comments