हृदय शस्त्रक्रिया होणाऱ्या बालक व त्यांच्या पालकांची मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली भेट; शस्त्रक्रियेसाठी दिल्या शुभेच्छा
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
सांगली जिल्ह्यातील हृदयविकार असलेल्या ४० बालकांवर मुंबईतील एसआरसीसी रुग्णालयात पुढील दोन दिवस शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या बालकांची आणि त्यांच्या पालकांची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज रुग्णालयात जाऊन भेट घेतली तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यावेळी उपस्थित होते.शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या बालकांच्या पालकांशी संवाद साधताना श्री ठाकरे म्हणाले, डॉक्टरांना आपण देव मानतो. कोविडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच घटक आपले योगदान देऊन समाजसेवा करीत आहेत. या काळात काही डॉक्टर कोविड व्यतिरिक्त इतर आजार असणाऱ्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी गावोगावी जाऊन सेवा देत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज सांगली जिल्ह्यातील या बालकांना असलेला आजार वेळेत लक्षात आल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व घटकांना यावेळी श्री ठाकरे यांनी धन्यवाद दिले.
No comments