web-ads-yml-728x90

Breaking News

वक्फ नोंदणीकृत संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार – मंत्री नवाब मलिक

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका ट्रस्टला शासनाकडून जमीन अधिग्रहणाच्या भरपाईपोटी मिळणाऱ्या रकमेचा  परस्पर अपहार केल्याप्रकरणी तसेच यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच वक्फ मंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोघा जणांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वक्फ मंडळाचे पुणे प्रादेशिक वक्फ अधिकारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी इम्तियाज महम्मद हुसेन शेख (रा. रामनगर, येरवडा, पुणे) आणि चांद रमजान मुलाणी (राहणार सदर) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी आपसात संगनमत करून स्वतःला ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्टचे (मौजे माण, ता. मुळशी, जि. पुणे)अध्यक्ष आणि सचिव असल्याचे भासवून या रकमेचा अपहार केला आहे.ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळकडे नोंदणीकृत आहे. या मंडळाकडील 5 हेक्टर 51 आर क्षेत्राची जमीन एमआयडीसी अधिनियमान्वये राजीव गांधी तंत्रज्ञान टप्पा क्रमांक चारसाठी शासनामार्फत अधिग्रहित करण्यात आली होती. यासाठी 9 कोटी 64 लाख रुपये इतकी निवाडा रक्कम मंजूर झाली होती. परंतु बरेच दिवस ही रक्कम न मिळाल्याने ट्रस्टने वक्फ मंडळाला तसे कळविले. पुणे प्रादेशिक वक्फ कार्यालयाकडून याची दखल घेऊन भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांचेकडे चौकशी करण्यात आली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

No comments