web-ads-yml-728x90

Breaking News

पनवेलमधील सराफा बाजारात रॉबरी;व्यापाऱ्यावर हल्ला करून १२०० ग्राम सोने घेऊन हल्लेखोर पसार

 


BY - आशीष चौधरी,युवा महाराष्ट्र लाइव रायगड

पनवेलमधील सराफा बाजारात आज दुपारी पावणेचार च्या सुमारास एका सोन्याचया दागिन्यांची डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉय वर अज्ञात इसमांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात पिस्तुलीचा दस्ता मारला असून त्याच्या हातातील सोने असलेली पिशवी घेऊन हल्लेखोर पसार झाले. या पिशवीत साधारण १२०० ग्राम सोने असल्याचे समजते. सराफा बाजारातील सोने पॉलिश करणारे रावसाहेब पांडुरंग कोळेकर यांच्या पेढीवर आलेल्या एका इसमावर हा हल्ला झाला. सदर हल्लेखोर एका दुचाकीवरून पसार झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जातोय.

No comments