web-ads-yml-728x90

Breaking News

महापुरुषांच्या चरित्र वाचनातून उद्याची पिढी सक्षम घडेल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

महापुरुषांच्या चरित्र वाचनातून उद्याची पिढी सक्षम घडणार असल्याने महापुरुषांच्या चरित्र साधने समित्यांनी अतिशय वेगाने काम करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समिती यांच्या स्वतंत्र बैठका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली  झाल्या. यावेळी ते बोलत होते.शासनाने विविध चरित्र साधने समित्यांचे पुनर्गठन केल्यानंतर शासनाने संबंधित समित्यांच्या बैठकांचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये त्या-त्या चरित्र साधने समित्यांच्या सदस्य सचिवांनी प्रकाशन समित्यांचा आजवर केलेल्या कामांचा अहवाल मांडला आणि पुढील वर्षभरामध्ये हाती घ्यावयाच्या उपक्रमांची माहिती दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशनातील सहाव्या खंडाचे प्रकाशन लवकर करून ते लोकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध नसलेले आणि लोकांची मागणी असलेले सर्व खंड तातडीने आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जावेत, अशा सूचना करून यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

 

No comments