web-ads-yml-728x90

Breaking News

डेल्फिक कौन्सिलने महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा जतन करावा : राज्यपाल

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी डेल्फिक कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेच्या बोधचिन्हाचे (लोगो) आज राजभवन येथे अनावरण केले. कौन्सिलच्या माध्यमातून राज्यात कलाकार, सांस्कृतिक संघटना व समूहांना दृकश्राव्य कला व साहित्य कला सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.महाराष्ट्र ही कला, नृत्य, वादनकला व संस्कृतीची खाण असून डेल्फिक कौन्सिलच्या राज्य शाखेच्या माध्यमातून राज्याच्या कला, आदिवासी कला, संस्कृती व सिनेमाला चालना मिळेल. कौन्सिलने राज्याचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा जगासमोर आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी बोलताना केले.कार्यक्रमाला खासदार हेमा मालिनी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष अभिनेते परेश रावल व डेल्फिक कौन्सिलचे महाराष्ट्र अध्यक्ष व भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी साहिल सेठ प्रामुख्याने उपस्थित होते. राज्य डेल्फिक कौन्सिलचे सदस्य अभी मित्तल, सुरेश थॉमस, सिने निर्माते अली अकबर सुलतान अहमद व चित्रपट क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

No comments