web-ads-yml-728x90

Breaking News

दिल्लीचा फोटो दाखवुन गल्लीचा ठेका;झाकली मुठ सवाकोटीची ट्रामाकेअर सेन्टरसाठी 2 कोटीचे टेंडर

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड ,ठाणे

खाणारे तुपाशी खातात पहाणारे उपाशी राहातात बगलबच्चे कार्यकर्ते कम ठेकेदार सच्चे अधिकारी टक्केवारीचे पक्के मात्र साहेब आम्हालाही काम दयाना अशी विनवणीकरून विकासाच्या सोबत जाण्याचा प्रयत्न करणारे अनेक जण सध्या वेटींगवर असल्याने त्यांनी झाकल्या मुठीची झाकणे काढायाचा काम केला तर राग यायाला नको त्या..त्या साहेबाना….!

हातात पदाचा अधिकार आणि सत्ता सिहासन असल्यावर त्यांनी काहीही करावं त्यांना कायदा आड येत नाही शिवाय त्यांचाच म्हणणं अंतिम असतं याचा अनुभव सामान्याना आला आहे.असाच अनुभव मुरबाडच्या ट्रामाकेअर सेन्टरच्या कामात आला आहे.येथे सरकारला महत्व नाही ठेकेदार कार्यकर्ते अधिकारी आणि टक्केवारी यांचा हितसंबध महत्वाचा साहेब सुध्दा त्यावर प्रसन्न होऊन चार टाळकी आणि दोन डोलकीवर थाप मारून वेळ काढुन जातात त्यामुळे भ्रष्टाचार शब्द आता नॉरमल झाला आहे.त्याची किर्ती नाहीच उलट त्याची संगती वाढू लागल्यात कोणी  विरोधी कोण सत्ताधारी या पेक्षा ठेकेदार महत्वाचा आहे.आरोग्याच्या सोयीसुविधा पेक्षा इमारती आणि त्यावरचा छपर कोटयानं कोटी बा तुघाल पोटी असा मुरबाडचा ट्रामाकेअर सेन्टर  जसं ठेकेदाराना माळशेजघाटाचा धबधबाच बनुन राहीला आहे त्याची झाकली मुठ सव्वा लाखाची पावसाळयापुरती आणि भरपावसात दोन कोटीचा टेंडर काढला आता छपरा वरती  अशा नव्या टेंडर विकासाला शुभेच्छाच

      भ्रष्टाचार केल्या शिवाय नाही राजकारण चालणार नाही नेतृत्वनिर्माण होणार नाही निवडणुक लावता येणार आणि नाही टक्केवारी मिळणार त्यामुळे आपण फक्त वास्तु दाखवायाचे काम करायाचे वास्तुस्थिती आपोआप निर्माण होईल मात्र दिल्लीचा फोटो दाखवुन गल्लीचा ठेका मिळवता येतो यावर विश्‍वास ठेवावाच लागेल.

    मुरबाड ट्रामाकेअर सेन्टर कशासाठी त्यामध्ये कोणाला आतापर्यंत उपौचार मिळाले त्यावर किती  खर्च झाला त्यामध्ये मालामाल कोण झाले आणि जनतेचे आरोग्य यंत्रणे विना काय हाल झाले याचा हिशोब फक्त वरच्याकडेच असेल अधिकारी फक्त लोकांच्या नावाने टेंडरच्या भावाने चांगभल करतात त्यावर नाही आरोग्यमंञ्याचे नियंत्रण आणि नाही सरकारचं तेरी भी चुप मेरी भी चुप तु तिकडेच टेंडर भर मी इकडचे भरतो मधला कार्यकर्ता टेंडर भरेपर्यंत या साहेबाच्या माणसाचा काम टेंडर होण्याअगोदरच पुर्ण करतो अशी स्थिती मुरबाड विधानसभा आणि भिवंडी लोकसभेत सुरू आहे त्याचा जास्त प्रमाण मुरबाडक तालुक्यात असल्याने मुरबाडच्या ट्रामाकेअर सेन्टरला दरवर्षी  कोटीचा निधी मिळत आहे.

       गेल्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या कालावधीत ट्रामाकेअर सेन्टर मंजुर झाला कामाला सुरूवात झाली भाजपा सेनेच्या कालावधीत ट्रामाकेअर सेन्टर पुर्ण होताच अपुर्ण राहिले तात्कालीन  ठेकेदारानी काम अपुर्ण ठेवले त्यावर पुन्हा टेंडर काढुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हर्षवर्धन वाघ यानी कामाचे नियंत्रण केले  पैसे काढले तोच कोरोनाचा निधी त्यावर टाकला  पुन्हा वाघ जोमात आला त्यानंरत विनाटेंडर रस्त्याचा काम मातीवर डांबर टाकून केले कोरोना उपयोजना यंत्रणा अपुर्‍या असताना पावसाळयातच आत जुलै महिण्यात ट्रामाकेअर सेन्टरवर कोटीचा पत्राशेड उभा केला आणि कोरोना मावळला म्हणताच पुन्हा ट्रामाकेअर सेन्टरचा पहिला मजला बांधकामसाठी 2 कोटीचा टेंडर काढला काय चाललंय महाविकास अघाडीच्या राज्यात असं विचारणार नाही कोणी येते कारण त्यांनाही टेंडर कुठे तरी घेयाचे आहेत मात्र सामान्य जनतेच्या नावाने हा धंदा करण्यापेक्षा असलेल्या इमारतीमध्ये प्रवेश करून रूग्णांना सेवा दिली पाहिजे यंत्रणा उभी करून तज्ञ डॉक्टर आले पाहिजेत याकडे सरकार पहाणार आहे का असा सवाल महाविकास आघाडी आणि आरोग्य मंञ्याना नागरिकांनी केला आहे.

   ज्या माळशेज घाट माथ्यावर आपघात होतात तेथे गरज आहे मात्र ट्रामाकेअर सेन्टर इमारती त्यावर पत्राचे हुड टाकून नुसत्या निवडणुका त्यासाठी पैसा आणि कार्यकर्ता सांभाळ सुरू आहे म्हणजे सव्वा लाखाचे पत्रे शेड टाकायाची गरज काय होती डायरेक्ट पहिला मजला बांधायाचा ना ? का कोटीचा खर्च केला पुन्हा नविनपत्रे भंगारमध्ये टाकुन झाकली मुठ सव्वालाखाची आणि त्यावर सुख दोन कोटीच्या टक्केवारीचा कशासाठी हे पाहिले पाहिजे.

 

No comments