web-ads-yml-728x90

Breaking News

विरारमध्ये ICICI बँकेत सशस्त्र दरोड्याचा थरार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – विरार

विरारमध्ये आज रात्री 8 च्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. विरार मध्ये सशस्त्र हल्ला करीत आयसीआयसीआय बँकेवर दरोडा टाकण्यात आला आहे. विरार पूर्व स्टेशन परिसरातील आयसीआयसीआय बँकेत आज रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडल्यानं खळबळ उडाली असल्याचं समोर आलं आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

नागरिकांनी दरोडेखोराला पकडलं

दोन दरोडेखोरांनी हा सशस्त्र दरोडा टाकला. सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत असताना एका दरोडेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जो दरोडेखोर पकडलेला आहे तो दरोडेखोर याच बँकेत पूर्वी मॅनेजर असल्याचीही माहिती आहे.

एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

दरोडेखोरांच्या हल्ल्यात असिस्टंट मॅनेजर महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. योगिता वर्तक-चौधरी असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर श्रद्धा देवरुखकर असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी हल्ल्यात जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं मात्र एका महिलेचा मृत्यू झाला. श्रद्धा देवरुखकर या महिलेवर उपचार करण्यात येत आहेत.

No comments