web-ads-yml-728x90

Breaking News

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागणार CET प्रवेश परिक्षा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

दहावीच्या निकालांनंतर आता अकरावीच्या प्रवेशांसबंधातील बातमी जाहीर करण्यात आली आहे. अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आधी CET प्रवेश परिक्षा घेण्यात येणार आहे. ही परिक्षा 21 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.CET प्रवेश परिक्षा ही ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. तसेच, परीक्षा देणे ऐच्छिक असणार आहे.  तसेच, हा पेपर 2 तासांचा असणार असून  11 ते 1 या वेळात होणार आहे. एकूण 100 गुणांचा हा पेपर असेल. स्वरूप हे multiple चॉईस ऑप्शन असणार आहे.  एकूण 8 भाषांपैकी एका भाषेतून परीक्षा देता येणार आहे. 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित पेपर असून यात इंग्रजी 25 गूण, गणित भाग 1 आणि 2 -25 गूण असणार आहे.ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान  भाग 1 आणि 2 25 गूण आणि सामाजिक शास्त्र (राज्य शास्त्र,इतिहास, भूगोल 25 गुण ) अशी विभागणी करण्यात आली आहे. परीक्षेकरता फॉर्म मात्र ऑनलाईन भरावा लागणार  आहे. 20 ते 26 जुलै दरम्यान ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली आहे.

No comments